इंदुमती डोणगावकर अपात्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेत चुरस वाढली
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन छाननी प्रक्रियेत बाद झालेल्या बड्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या फेरीत अर्ज बाद ठरलेल्या १० पैकी तब्बल ९ उमेदवारांचे अपील विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी शुक्रवारी वैध ठरविले. यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आणि कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्यासह नऊ जणांचा समावेश असून, या निर्णयामुळे आता बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस कमालीची वाढली आहे. दरम्यान, गंगापूरमधील इंदुमती डोणगावकर यांचे अपील मात्र नामंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेच्या संचालकांच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी १५४ उमेदवारांनी २१४ अर्ज दाखल केले होते. वैयक्तिक भागधारक मतदारसंघातील एकमेव अर्जासह ४५ जणांचे अर्ज छाननीत रद्द झाले होते. समीर सत्तार, आ. संजना जाधव यांचा यात समावेश होता. अर्ज बाद ठरविण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयास दहा जणांनी सहनिबंधकांकडे आव्हान दिले होते.
जिल्हा बँकेच्या संचालकांच्या २१
जागांच्या निवडणुकीसाठी १५४ उमेदवारांनी २१४ अर्ज दाखल केले होते. वैयक्तिक भागधारक मतदारसंघातील एकमेव अर्जासह ४५ जणांचे अर्ज छाननीत रद्द झाले होते. समीर सत्तार, आ. संजना जाधव यांचा यात समावेश होता. अर्ज बाद ठरविण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयास दहा जणांनी सहनिबंधकांकडे आव्हान दिले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार यांचा कृषी व पणन प्रक्रिया मतदारसंघातील अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांनी अवैध ठरविला होता. समीर सत्तार यांच्या मालकीच्या जागेत सोयगाव येथे जिल्हा बँकेची शाखा असून, त्यापोटी त्यांना भाडे मिळते. त्यामुळे मऑफिस ऑफ प्रॉफिटफ नियमानुसार त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. हा
अर्ज मागे घेण्याची मुदत २३ जून
आ. संजना जाधव यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघाच्या कन्नड तालुक्यातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला होता. संजना जाधव यांच्या रिठ्ठी मोहर्डा सोसायटीच्या सदस्यत्वास दोन वर्षे न झाल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. मात्र, त्यांचे अपील मंजूर करण्यात आल्याने अर्ज कायम राहिला आहे. प्रणित पाटील, सुवर्णा जाधव, मनोज राठोड, रितेश मुनोत, प्रदीप शिंदे, मनोज देशमुख यांचेही अपील मंजूर करण्यात आले. इंदुमती डोणगावकर यांचा गंगापूर तालुका मतदारसंघातील अर्ज रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २३ जून रोजी संपणार असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
आक्षेप फेटाळत समीर सत्तार यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












